परिचय –
जैवविविधता आणि सजीव प्रजातींच संवर्धन ह्या व्यापक हेतुसाठी आपल्या पूर्वजांनी काही संकल्पना अंमलात आणल्या होत्या. त्या सगळ्या पद्धतींमुळे शाश्वत विकासाला फार मदत होत आली आहे .पारंपरिक रूढी ,दैवते,श्रद्धा,समजुती यांचा वापर करत ह्या पर्यावरण संवर्धनाच्या पारंपरिक पद्धती आजवर टिकवल्या गेल्या आहेत .
आज सर्रासपणे जंगलतोड, प्रदूषण आणि इकोसिस्टमचा ऱ्हास यामुळे भारताला गंभीर पर्यावरणीय संकटाचा सामना करावा लागतो. जलद शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि कृषी विस्तार यांमुळे जैवविविधता नष्ट होत आहे आणि निवासस्थानाचा लक्षणीय नाश होत आहे. हवा आणि पाण्याची गुणवत्ता खालावली आहे, ज्यामुळे आरोग्य समस्या आणि उपजीविकेचे नुकसान होत आहे, विशेषत: नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण समुदायांमध्ये. या चिंताजनक स्थितीमध्ये, भारतातील पारंपारिक पर्यावरण संवर्धन पद्धती मौल्यवान अंतर्दृष्टी आणि उपाय देतात. स्थानिक संस्कृती आणि रीतिरिवाजांमध्ये रुजलेल्या या जुन्या पद्धती शाश्वत जीवनावर आणि समुदाय आणि त्यांचे वातावरण यांच्यातील सुसंवादी संबंधांवर भर देतात. या पद्धतींचा आढावा घेऊन, भूतकाळातील पिढ्यांच्या शहाणपणाचा सन्मान करताना आपण समकालीन पर्यावरणीय आव्हानांना तोंड देऊ शकतो. हे अन्वेषण केवळ तातडीच्या कृतीची गरजच नाही तर अधिक शाश्वत भविष्यासाठी या पद्धतींचे पुनरुज्जीवन करण्याच्या संभाव्यतेवर प्रकाश टाकते.
पर्यावरण संवर्धनाच्या काही पारंपरिक पद्धती
१ . वोतार-लोहार (वॉटर हार्वेस्टिंग): गाडगीळ (2001) महाराष्ट्रातील ग्रामीण समुदायांनी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्यासाठी वोतार-लोहार (पाणी साठवण टाक्या) कसे बांधले आणि व्यवस्थापित केले यावर प्रकाश टाकला.
२ . जिवानी (समुदाय-आधारित संवर्धन): गाडगीळ आणि बर्केस (1991 जीवनी, वन्यजीव अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी समुदायाच्या नेतृत्वाखालील संरक्षण उपक्रमाचे वर्णन करतात.
३ . वन पंचायती (वन परिषद): गाडगीळ (1991) व्हॅनबद्दल लिहितात.
पंचायती, समुदाय-व्यवस्थापित जंगले, जी शाश्वत सुनिश्चित करतात
वन व्यवस्थापन.
४ . (पवित्र ग्रोव्ह्ज): गाडगीळ आणि गुहा (1992) देवराई, पवित्र या विषयावर चर्चा करतात
स्थानिक समुदायांद्वारे संरक्षित ग्रोव्हज, जे जैवविविधता टिकवून ठेवतात.
या पैकी देवराई हे सहसा लहान, पवित्र क्षेत्र असतात, विशेषत: ग्रामीण सेटिंग्जमध्ये, जेथे स्थानिक समुदाय सांस्कृतिक किंवा धार्मिक महत्त्वामुळे नैसर्गिक अधिवास संरक्षित करतात. देवराई हे जैवविविधता जतन करण्यासाठी प्राण्यांच्या जाण्या-येण्यासाठी कॉरिडॉर म्हणून काम करते.
देवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा वेगळे असे एक जंगल होय. देवराई नावाचा अर्थ असा आहे की देव कीव देवी च्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारी राई. इंग्लिश भाषेत याला सेक्रेड ग्रोव्ह म्हणतात. ही परंपरेने समाजाने सांभाळलेली असतात. अशा वनांना अनेकदा शरणवन किंवा अभयस्थान असेही म्हणले जाते. देवराया जशा देशात विखुरलेल्या आहेत तशा त्या भारताबाहेरही आहेत. प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीत देवराई कहा उल्लेख सापडतो.जगभरात अश्या खूप साऱ्या देवराई आहेत .
इतिहास
गावाच्या दृष्टीने ती एक समाजव्यवस्थाच आहे. देवराई ची संकल्पना ही गावागावनुसार वेगळी आढळते. त्यामध्ये काही भागामध्ये देवराई ही अगदी जवळचा नैसर्गिक संसाधनाचा स्रोत असल्याने त्या गावाने किंवा समाजाने ती राखून ठेवली आहे. उदा. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील पहूर गावची देवराई ही त्यापैकी एक. तर काही भागात नैसर्गिक घटकांची पूजा केली जावी किंवा त्या जंगलातील घटकांच्या भीतीपोटी ह्या देवराई राखल्या गेल्या आहेत. उदा. ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असणाऱ्या देवराया ह्या जंगलातल्या वाघाच्या भीतीपोटी ही राखलेल्या आढळतात. आगरकर संशोधन केंद्राच्या काही निरिक्षणानुसार काही देवराया मध्ये स्मशान ही आढळते. तिथे वेगवेगळ्या समाजाचे पुरण्याचे ठिकाण आहे त्या कारणासाठी देवराई सुद्धा जतन केलेल्या आहेत. जव्हार तालुक्यात असणारी हाडे गावाची देवराई ही सात गावांसाठी मिळून बनलेली आहे. सणासाठी एकत्र येऊन गावागातील एकोपा टिकावा व एकाच देवराईचा वापर हा ७ गावासाठी या उद्देशाने सुद्धा ही देवराई जतन केलेली आढळली.
मुर्ती पूजा सुरू होण्याच्या आधीपासून ही देवराई ही संकल्पना सुरू आहे.
पर्यावरण आणि जैव विविधता हे शब्द जरी आज आले असले तरीही त्यांच्या संवर्धनाची व संरक्षणाचीची सोय आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीपासूनच करून ठेवली हीच होती देव राहील एखादं छोटसं दगडी बांधकामाचे देऊळ किंवा कमरेत वाकलेले या झाडाखालचा एक चौथरा आणि उघड्या वर बसलेला तो देव मग तो म्हसोबा, भुतोबा, चाळोबा, वेताळबा, अथवा नावलाई, घाटजाई, वाघजाई, जननी-माता सारखी देवी आणि आसपासच्या परिसरातील एखाद्या वाळवंटातील मरुस्थळ सारखा हिरव्यागार पाचूचा झाडोरा म्हणजेच देवराई
हिमाचल ते केरळ अश्या देशाच्या सगळ्याच भगत ह्या देवराईया वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात .
महाराष्ट्रात विशेषतः सह्याद्री डोंगर रांगेच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात देवराई आढळतात.
भारतात सुमारे १. ५ लाख देवराया आहेत. जवळपास प्रत्येक राज्यात त्या आहेत. सगळ्यात जास्त देवराया हिमाचल प्रदेशात असून त्यानंतर कर्नाटक व महाराष्ट्र आढळून येतात. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व देवराया सह्याद्री परिसरात, कोकण आणि मावळ भागांत तसेच घाट माथ्यावर आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (१९९९) अहवालानुसार महाराष्ट्रात सु. ३६०० च्या वर देवराया नोंदविल्या आहेत. देवराईचा विस्तार हा एका झाडाच्या देवराईपासून ते एक ते शंभर एकरपर्यंत असू शकतो. सर्वसाधारण गावाच्यामध्ये /सीमेवर असलेली देवराई लहान असते.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील देवराया
जिल्हा देवरायांची संख्या
रत्नागिरी १७३६
पुणे २३६
सिंधुदुर्ग १४९७
नाशिक १
रायगड २१
अहमदनगर ७
ठाणे ३२
जळगाव ४
मुंबई १
भंडारा ४
कोल्हापूर १८५
गोंदिया १
सांगली १२
चंद्रपुर ४
सातारा २३
यवतमाळ ४
संगमेश्वर या तालुक्यात तर अंगवली गावात दोनच झाडांची देवराई आढळते.ही दोन झाडे काटे सावर आणि बेहडा आहेत . इथे महाधनेश पक्षाच्या जोडीचे वास्तव्य आहे .
वेगवेगळ्या राज्यात ओळखले जाणारी देवराई –
देवराई ही विविध भागात विविध नावांनी ओळखली जाते.
महाराष्ट्रात- देवराई / देवरहाटी
कर्नाटक- देवराकाडू
तामिळनाडू- कोवील काडू
केरळ- काव्यू
मध्यप्रदेश/छत्तीसगड – सरना
उत्तराखंड- देवबन
देवराई चे महत्त्व
देवराईचे महत्त्व तिच्या आकारमानापेक्षा त्यात आढळणाऱ्या प्रजातींवर अवलंबून असते. ती एक शिखर परिसंस्था (Climax Ecosystem) आहे. ज्या परिसरात देवराई असेल त्या परिसरातील ती सर्वोच्च प्रकारची नैसर्गिक अवस्था असते. ती एक जनुक पेढी , बीज पेढी आणि जल पेढी सुद्धा आहे. तिथे बरेच उगम पावणारे झरे, जलप्रवाह बारमाही असतात. काही प्रकारच्या वनस्पती तसेच प्राणी आता केवळ देवरायांतच आढळतात. देवराई ही समृद्ध वनश्री वारसा आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य देवराया निमसदाहरित आणि आर्द्र पानझडी जंगल प्रकारच्या आहेत.
1)आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची उपलब्धता हे देवरायांचे एक वैशिष्ट्य मानले जाते.
2)फळे, फुले, मध, वाळलेले लाकूड इ. गोळा करण्यासाठी देवरायांचा उपयोग होतो.
3)अशा परिसरात निर्वनीकरणास प्रतिबंध असल्यामुळे वृक्षांचे संरक्षण होते आणि मृदेची धूप होत नाही.
4)बहुतेक देवराया या जलाशयाजवळ असतात. त्यामुळे लोकांची पाण्याची गरज भागविण्यास देवराया नकळत उपयोगी पडतात.
– या पारंपरिक उपयोगाशिवाय आधुनिक दृष्ट्या या देवराया उपयुक्त आहेत.
1) देवराया या जैविक विविधतेच्या दृष्टीने समृद्ध असतात.
2) शिकारी व वृक्षतोडीला बंदी असल्याने प्राण्यांचा अधिवास सुरक्षित राहतो.
3) देवरायांच्या आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा देवरायांमध्ये प्राणी व वनस्पती यांच्या वाढीसाठी अनुकूल पर्यावरण असते. त्यांचे संरक्षण होत असल्याने जनुकीय विविधता राखली जाते.
सांस्कृतिक महत्त्व
वीरगळ : प्राचीन काळी निसर्गात राहणाऱ्या आदिवासी जमातींच्या दोन टोळ्यांमध्ये लढाई, भांडणे होत. ह्यात एखाद्या टोळीचा सेनापती धारातीर्थी पडे, बहुतांशी मारले जात. अशा हुतात्म्यांच्या स्मरणार्थ कोरलेली शिळा /स्मारक शिळा म्हणजे वीरगळ. वीरगळावरील मानवी आकृत्या ओबडधोबड असतात. असे वीरगळ देवराईच्या ठिकाणी, युद्धभूमी ठिकाणी, ज्या गावात ते वीर राहत त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
देवराई मध्ये आढळणारे सजीव –
रानटी मांजर, उद मांजर, भारतीय काळा ससा, धामण, फुरस, बैल बेडूक, फुगणारा बेडूक, स्किटरिंग बेडूक, मोर, शिक्रा, कापशी, टकाचोर, नाराच गरूड, राखी धनेश, पोपट, चातक, पावश्या, करुणा, कोकिळ, भारद्वाज, कवडा, हरियल्,तित्तर, पिंगळा, रातवा, निलपंख, हुदहुद, मराठा सुतार, तांबट, मानमोडा, चंडोल, पाकोळी, भिंगरी, खाटिक, कोतवाल, मैना, बुलबुल, सातभाई, स्वर्गीय नर्तक, वटवट्या, शिंपी, दयाळ, चिरक, गप्पीदास, राखीटिट, इतर पक्षी आढळून येतात.
तर खाणीच्या परिसरात, हळदीकुंकू, पाणडूबी, वारकरी, लाजरी पाणकोंबडी, टिटवी, माळ टिटवी, धोबी. तुतारी, खंड्या, छोटा धिवर, विविध प्रकारचे साप, पाली, सर्ड्यांच्या प्रजाती इतर पक्षांच्या प्रजाती दिसून येतात. २४३ प्रजातींच्या पक्षांमधील आठ पक्ष्यांचं अस्तित्व जागतिक अहवाल नुसार धोक्यात आहेत.
माळरानावर घरटी करणारे पक्षी : रातवा, टिटवी, चंडोल इतर.
माळावरच्या गवतात घरटी करणारे पक्षी: वाटवट्याच्या इतर
झाडात घरटी करणारे पक्षी: पोपट, मैना, सुतार, तांबट इतर.
पाण्याच्या जवळ घरटी करणारे पक्षी : पाण कोंबडी, बदके, ठीबुकली इतर.
शिकारी पक्षी : शिक्रा, कापशी घार, पिंगळा
परदेशातून स्थलांतरित होऊन येणारे पक्षी :
अमुर ससाणा : मंगोलिया
रान खरूची : युरोप
वटवट्या : युरोप व इतर.
बेलनची फटाकडी : मध्य आशिया / युरोप
आपण प्राणी आणि पक्षी यांचा हा नैसर्गिक अधिवास नष्ट करत आहोत. झाडे लावून आपण तो अधिवास नष्ट करत आहोत. जाणकारांना विचारून झाडे लावावीत. खरं सांगायचं तर आत्ता आहे, तसाच आणि त्याच अवस्थेत अधिवास जतन कारणं हा सर्वात उत्तम पर्याय आहे”
हे देवराईक्षेत्र कमी होण्याची काही कारणे थोडक्यात सांगायची म्हणली तर गुरांची अतिचराई, गावातील तरुण मुलांचा त्याकडे असणारा दृष्टीकोन, रस्तेबांधणी, धरणनिर्मिती ह्या कारणाने सुद्धा देवराईचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. पण ह्या सर्व गोष्टीचा विचार करता काही कळीचे मुद्दे म्हणजे क्षेत्र कमी होण्याची कारणे, देवराई आणि लोक सहसंबध समजून घेणे तितके महत्वाचे आहे
माधव गाडगीळ यांचे योगदान
पर्यावरण तज्ञ डॉ माधव गाडगीळ यांचे देवराई संवर्धनासाठी खूप मोठे योगदान आहे . त्यांनी काढेलेले निष्कर्ष आणि केलेल्या शिफारशी पाहू .
माधव गाडगीळ यांचे निष्कर्ष –
देवराई संरक्षित भागात आसपासच्या जंगलांच्या तुलनेत उच्च प्रजातींची समृद्धता आणि स्थानिकता दिसून आली
शिफारशी
1) पारंपारिक संवर्धन पद्धती ओळखा आणि त्यांचा आदर करा पारंपारिक ज्ञान दस्तऐवजीकरण आणि जतन करा.
2) समुदायाच्या नेतृत्वाखालील संवर्धन उपक्रमांना समर्थन द्या.
3) पारंपारिक ज्ञान आधुनिक संवर्धन पद्धतींमध्ये समाकलित करा सहभागी संसाधन व्यवस्थापनाला प्रोत्साहन द्या.
देवरायांच्या अस्तित्वास धोका
नागरीकरणात वाढ, संसाधनांचा अतिरिक्त वापर, पर्यावरण गुणवत्तेत होत असलेली घट, अपवादात्मक राबविलेल्या चुकीच्या धार्मिक प्रवृत्ती ,विकासाच्या रेट्यामुळे, होत असणाऱ्या नैसर्गिक र्हासाच्या पार्श्वभूमीवर या देवरायांना धोका निर्माण झाला आहे. त्या-त्या प्रदेशांतील जैवविविधता तिथे दिसली तरी तिथे होत असलेला नाशसुद्धा पाहण्यात येतो. देवरायांभोवतीचा प्रदेश उघडाबोडका झाल्याने आतील प्राणी पक्ष्यांना ये-जा करण्यासाठी लागणारे हरितपट्टे (कॉरिडॉर्स) नाहीसे झाले आहेत. देवराईचे क्षेत्रही हळूहळू घटत चालले आहे. अशा वेळी त्या राखून त्यांना पुनरुज्जीवित करणे गरजेचे आहे. त्याचे शास्त्रीय महत्त्व व उपयुक्तता पटवून देऊन त्याचे जतन करणे स्थानिक लोकांमार्फत शक्य होईल. याचा फायदा स्थानिक लोकांना होईल. विविध प्रकारच्या पर्यावरणीय सेवा मानवाला देवराईमुळे वर्षानुवर्षे मिळत आहेत. भूजल पुनर्भरण, वर्षभर वाहणारे झरे, अनेक रोगांवर औषध पुरविणाऱ्या वनस्पती, शेतातील किडे, उंदीर यांवर नियंत्रण ठेवणारे साप व घुबड यांसारखे प्राणी, भात खाचरांसाठी लागणारा पालापाचोळा म्हणजे राब इत्यादी अनेक फायदे मानवाला या देवराया पुरवित असतात. तापमान नियंत्रण करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम देवरायांमुळे शक्य होते.
संवर्धनासाठी प्रयत्न–
कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात ‘सह्याद्री संवर्धन केंद्र’ यांच्याकडून देवराई संवर्धन व संरक्षण कार्यशाळा राबविल्या जातात. यामध्ये देवराईचे महत्व त्यांचे उपयोग देवराईंना असणारे धोके याबाबतची माहिती चित्रफितीतून दिली जाते.
हा नैसर्गिक वारसा जतन करण्यासाठी शास्त्रीय निकषांनुसार त्यांचे महत्त्व पटवून द्यायला हवे.